vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’छायाचित्रे पाठविण्यासाठी 02 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान..

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’छायाचित्रे पाठविण्यासाठी 02 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान..

ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे. ही छायाचित्रे thanedio2025@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत. छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख 02 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

या स्पर्धेमध्ये 1) ‘वन्यजीव’, 2) ‘निसर्ग’, 3) ‘संस्कृती आणि परंपरा’ तसेच 4) ‘बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प’ या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जातील. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 4 छायाचित्रे पाठवता येतील. एकाच विषयाचे चार फोटो असल्यास Category_Name_mobile number_1; Category_Name_mobile number_2 ; Category_Name_mobile number_3 ; Category_Name_mobile number_4 अशी नावे देवून पाठवावीत. ही छायाचित्रे उच्च दर्जाची (High-Resolution HD 10MB) असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे thanedio2025@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत. छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख 02 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम 100 छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आहे.

ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवडअरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी 05 बालविवाह थांबविण्यास यशस्वी…

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 143 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती..

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..