vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आदी सेवा देतांनाच यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या भाविकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कर्णपूरा यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वाहतुक शाखा उपायुक्त भुजंग तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, विज वितरण कंपनी, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेचे सर्व विभाग तसेच छावणी परिसराचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, यात्रोत्सवात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा, आरोग्य सुविधा व सतर्क पोलीस यंत्रणा यांची सज्जता असावी. सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापित करावा. खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करावी. रुग्णवाहिका व अग्निशमन बंब वाहतुकीसाठी पुरेसी जागा असावी. यात्रोत्सवातील आवश्यक परवानग्यांसाठी यात्रा स्थळीच कक्ष स्थापन करावा. यात्रोत्सवात शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

पोलीस दलाने सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावून गर्दीवर नियंत्रण ठेवावे. दामिनी पथक तैनात ठेवावे. याशिवाय साध्या वेशातील पोलीस सज्ज ठेवावे,अशा सुचनाही त्यांनी केल्या.

०००००

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..

तालुका व गावपातळीवर आढावा घेऊन मान्सुन पूर्व तयारीचे आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..