vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून कार्यालयीन सुविधा द्या – आमदार विलास तरे

मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून कार्यालयीन सुविधा द्या – आमदार विलास तरे

 

मुंबई / पालघर. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासन मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून संगणक, प्रिंटर व इतर कार्यालयीन सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या असे आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे जोरदार मागणी केली आहे.

यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणजेच विधानसभेचे २८८ आमदार व विधान परिषदेचे ७८ आमदार असे एकूण ३६६ लोकप्रतिनिधी राज्यातील कानाकोपऱ्यातून विविध प्रश्न व मागण्या घेऊन मंत्रालयात वेळोवेळी येत असतात. मंत्रालयातील विविध विभागांशी, तसेच माननीय मंत्र्यांशी संपर्क साधून ते संबंधित निवेदने सादर करतात. मात्र, सद्यस्थितीत मंत्रालय परिसरात आमदारांसाठी स्वतंत्ररित्या कुठलीही कार्यालयीन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित निवेदनं तयार करणे, झेरॉक्स काढणे, दुरुस्त्या करणे, पत्रव्यवहार करणे अशा अनेक बाबींसाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा वेळेवर योग्य स्वरूपात कागदपत्रे तयार करता येत नाहीत, किंवा बाहेरच्या दुकानांवर अवलंबून राहावे लागते, जे योग्य व सुरक्षितही नाही. त्यामुळे, मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र “आमदार कक्ष” स्थापन करण्यात यावा, व त्या कक्षात संगणक, प्रिंटर, इंटरनेट कनेक्शन, झेरॉक्स मशीन, बसण्याची व्यवस्था व एक-दोन सहाय्यक कर्मचारी अशी आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या सुविधेमुळे आमदार व त्यांच्या सहाय्यकांना निवेदनं तयार करण्याची, प्रत घेण्याची व मंत्र्यांशी योग्यरित्या संपर्क साधण्याची प्रक्रिया अधिक सोपी, कार्यक्षम व वेळेवर होईल, असे लेखी निवेदनाद्वारे आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या कडे लेखी आहे.

00000

संबंधित पोस्ट

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश  नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

मुंबईच्या कुर्ला नेहस्नगरात एक नगर एक होळी…

vishwatmaklokswamivarta

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta