
ग्रामीण डाक जीवन विमा प्रतिनिधी नियुक्तीसाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, व्यावसायिक प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर डाक विभागात कन्नड, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये ग्रामीण डाक जीवन विमा प्रतिनिधी एकूण ५० जागांवर नेमणे आहेत.
आवश्यक पात्रताः- वयोमर्यादा-१८ ते ६० वर्षे
शैक्षणिक पात्रता – पाच हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास –किमान १०वी पास, पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास – किमान १२ वी पास , सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त कर्मचारी, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी प्रवर अधीक्षक, डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर -४३१००१ यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्राची एक साक्षांकीत पत्र व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आवेदन पत्र सादर करावी. तसेच या नियुक्ती तात्पुरत्या आणि कमिशन तत्वावर आहे,याची नोंद घ्यावी,असे प्रवर अधीक्षक, डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी कळविले आहे.
०००००



