vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन…

नागपूर प्रतिनिधी : जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे १२ हजार वर्षाहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध जीवन पद्धती सांगणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घोगली येथे निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (एनजेटी) वेद पाठशाळेचे उद्घाटन आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते.आपली प्राचीन परंपरा पुढे नेण्यासाठी सुरू करण्यात आलेला वेद पाठशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्ञान विज्ञानाचा आधार वेदच आहेत. सनातन धर्म संपूर्ण मानव जातीचे कल्याण सांगतो. हिंदू जीवन ही जगातील आदर्श पद्धती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

वेद हेच आपले मूळ धन असल्याचे सांगून गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा पायाच वेद आहे. जगातील सर्व संस्कृती आणि भाषांचा जन्म वेदांनंतर झाला आहे. वेद हे केवळ हिंदूंसाठी नाही तर मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.

प्रारंभी रोहन ठाकर यांनी प्रास्ताविक केले. आचार्य सागर शर्मा, नरेंद्र झा प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन