vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 25 सप्टेंबर रोजी उद्घाटन 

“मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 25 सप्टेंबर रोजी उद्घाटन

जालना, प्रतिनिधी: जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थी तसेच नवउद्योजकांमध्ये नाविन्य व उद्योजकता वृद्धीसाठी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे MAGIC (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council), छत्रपती संभाजीनगर यांच्याव्दारे इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने, सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील को-वर्किंग व कार्यालयीन जागेचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या अनुषंगाने, गुरुवार, दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्री, मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत “मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” या केंद्राचा उद्घाटन समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर च्या स्थापनेमुळे नवीन उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन,प्रशिक्षण व सुविधा मिळणार असून, नवउद्योजकांना स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होणार आहे.त्याचप्रमाणे बँक व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी, कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा थेट अनुभव व नेटवर्किंग होणार, जिल्ह्यातील नव्या उद्योग जगतात सक्रिय सहभाग व संधी उपलब्ध होणार आहे. सदर उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून आपल्या प्रगतीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक,आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

रिव्हर्स बायर-सेलर मीट २०२६ उद्घाटन संपन्न

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता MH24- CF ही नवीन मालिका सुरु होणार

महिलासक्षमीकरण-जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड खाटेघरच्या सविता गायकर यांनी फुलवला मशरूम शेतीतून यशाचा मळा..

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta

उद्योग पुरस्कार वितरण सोहळा-औद्योगिक विकासाला चालना;सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण