vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

नवी दिल्ली प्रतिनिधी

नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या 64 वा राष्ट्रीय कला प्रदर्शन पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या सगळ्यांच्या कलाकृती इतर कलाकारांना प्रेरणा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

भारतीय परंपरेत कलेला खूप पूर्वीपासून एक आध्यात्मिक साधनेचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले. कला ही केवळ सौंदर्याचा अनुभव घेण्याचे माध्यम नसून, ती आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्याचे आणि अधिक संवेदनशील समाज घडवण्याचे एक शक्तिशाली साधन आहे, असे त्या म्हणाल्या. कलाकार त्यांच्या कल्पना, दृष्टीकोन आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून एका नव्या भारताचे चित्र सादर करत आहेत, हे पाहून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक कलाकार हा आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आपला वेळ, ऊर्जा आणि साधनसंपत्तीची गुंतवणूक करत असतो ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. त्यांच्या कलाकृतींना योग्य मूल्य मिळाले तर कलाकारांना तसेच कला क्षेत्राला पेशा म्हणून स्वीकारू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असेही त्या म्हणाल्या. ललित कला अकादमी कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे पाहून आनंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या या पुढाकारामुळे कलाकारांना आर्थिक मदत मिळेल आणि आपल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल ही बाब त्यांनी नमूद केली. कलाप्रेमींना केवळ कलाकृतींचे कौतुक करू नये, तर त्यांनी त्या घरी विकत घेऊन जाव्यात असे आवाहन त्यांनी केले. आर्थिक आणि सांस्कृतिक ताकद म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख: माओवादग्रस्त भागात विकासाची बस पोहोचली*

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज अतिउष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा हायअलर्ट; सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध..

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती