vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

रागासा चक्रीवादळ चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकले असून, आता ते वियतनामकडे त्या मार्गावर प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

रागासा चक्रीवादळ चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकले असून, आता ते वियतनामकडे त्या मार्गावर प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

 विदेश प्रतिनिधी –

रागासा नावाचे प्रचंड मोठे चक्रीवादळ चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकले असून, आता ते वियतनामकडे वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, रागासामुळे ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग शहरात दहा हजारहून अधिक झाडे उन्मळून पडली आणि रस्ते जलमय झाले. झुहाई शहरातील काही रस्ते नद्या बनलेत, त्यामुळे रहिवाशांना बचावकार्यांसाठी बोटांचा वापर करावा लागला. ग्वांगडोंग प्रांतात वीस लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

वियतनाममधील प्रशासनही तातडीने सक्रिय झाले असून पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनी धरणे, रुग्णालये आणि किनारी मालमत्तांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. काही उड्डाणे रद्द किंवा पुनर्निर्धारित करण्यात आली आहेत. या चक्रीवादळाचा परिणाम तैवान आणि फिलिपिन्समध्येही मोठा झाला असून तैवानमध्ये चौदा आणि फिलिपिन्समध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. रागासा चक्रीवादळामुळे घरांची हानी, झाडे पडणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे, तर प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

संबंधित पोस्ट

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

देशभरात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता ,सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नदीपात्रातून अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणी ५६ कोटी ६८ लाखांचा दंड;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोषी अधिकारी निलंबित— महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार