vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी आज जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली.

यावेळी श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, या नैसर्गिक संकटाच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, बाधीत शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषिमंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करुन, शासनामार्फत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार श्रीमती छाया पवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात कोकण रेल्वेचा गोंधळ – विशेष गाड्या उशिरा

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करूया- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ▪️मेट्रो, बससेवा, रिंग रोड, मिसिंग लिंक, पूल व रस्ते प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यावर भर▪️वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमणे व डबल पार्किंगच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक वाहतूक समित्या स्थापन होणार▪️सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याला प्राधान्य▪️वाहतूक व्यवस्थेतील समस्या व उपाययोजनांबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे सादरीकरण…

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम