vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

मुंबई, प्रतिनिधी: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.

अटी व बंधने· परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.· उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.· शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.· ध्वनी प्रदूषण नियम, २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करणे आवश्यक राहील.· तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.· आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.हा आदेश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (mumbaisuburban.gov.in) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवातील सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे, मात्र ठरवलेल्या मर्यादा आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेल, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव”- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta