vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा.

मुंबई प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरण्यास अडचण निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निर्देश दिले होते. त्यानुसार मंत्री दादाजी भुसे यांनी राज्य मंडळास केलेल्या सूचनेनुसार मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) स्वीकारण्याच्या तारखांना देखील १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे कळविण्यात आले होते. सदर नवीन परीक्षा केंद्रासंदर्भातील मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून असे प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके

vishwatmaklokswamivarta

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

आमदार श्रीम.चित्रा वाघ यांनी नमुंमपा घणसोली बेघर निवारा केंद्राची पाहणी करीत व्यक्त केले समाधान

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ