vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

जालना प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने दि.1.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे. तरी जिल्ह्यातील पात्र पदवी धारकांनी या मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे

मतदार नोंदणी अधिनियमान्वये जाहिर सूचना मंगळवार दि.30 सप्टेंबर 2025 प्रसिध्द करण्यात येईल. नोटीसीची पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रथम करण्यात येईल. नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येईल. हरकती व दावे गुरुवार दि.6 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत स्विकारण्यात येतील. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.25 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.25 नोव्हेंबर ते दि.10 डिसेंबर 2025 पर्यंत राहील. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई दि.25 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल. आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी मंगळवार दि.30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तहसील स्तरावर नमुना अर्ज क्र.18 वाटप व स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*

संबंधित पोस्ट

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने“जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी* *श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त* “*भारताच्या नकाशाची देशाची मानवी प्रतिकृती साकार*”

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta