vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध- महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे· महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मुंबईतील अभ्यास दौऱ्यात सुविधांबाबत समाधानी

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध- महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे· महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मुंबईतील अभ्यास दौऱ्यात सुविधांबाबत समाधानी

मुंबई, प्रतिनिधी: समस्याग्रस्त व गरजू महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे समितीच्या प्रमुख तथा आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि पुनर्वसनसंदर्भात योग्य सुविधा देण्यात येत असून, अधिक परिणामकारक व दीर्घकाळ उपाययोजना राबविण्यासाठी शासनास योग्य शिफारसी करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समितीने मुंबईतील भायखळा कारागृह, शताब्दी रुग्णालय (गोवंडी), बालसुधारगृह आणि महिला सुधारगृह (मानखुर्द) तसेच शहाजी मॅटर्निटी हॉस्पीटल (मानखुर्द) या संस्थांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान महिला व बाल विकास विभाग आणि नगरविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी आमदार मोनिका राजळे, सीमा हिरे, ॲड. श्रीजया चव्हाण, रंजना जाधव, सरोज आहिरे, सना मलिक, महेश सावंत, डॉ. ज्योती गायकवाड, चित्रा वाघ, डॉ. प्रज्ञा सातव, सुनिल शिंदे, डॉ. मनीषा कायंदे, मुंबई शहराच्या महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, उपनगराचे अधिकारी संजय धनगर, उपायुक्त सुवर्णा पवार, ठाण्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे, प्रेमा घाटगे आदी उपस्थित होते.

समिती सदस्यांनी महिला कारागृहाला भेट देऊन तेथील महिला बंदिवानांशी संवाद साधला. त्यांच्या आरोग्य, आहार, पाणीपुरवठा, ग्रंथालय, कौशल्य प्रशिक्षण आणि मुलांसाठी असलेल्या अंगणवाडीबाबत माहिती घेतली. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वास समिती सदस्यांनी दिला. शताब्दी रुग्णालय आणि शहाजी रुग्णालय येथे समितीने महिला व बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. मातृवंदना योजना, लक्ष्य योजना, औषधसाठा, स्वच्छता, सुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था याची पाहणी केली. बालसुधारगृह व महिला सुधारगृह (मानखुर्द) येथे महिलांच्या मानसिक आरोग्य, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

समिती प्रमुख मोनिका राजळे म्हणाल्या की, महिला व बालकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा, आधुनिक यंत्रसामग्री आणि सुरक्षित निवास उपलब्ध व्हावा यासाठी शासनाला ठोस शिफारसी करण्यात येतील. समस्याग्रस्त आणि गरजू महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती सर्वोतोपरी सहकार्य करेल.

या दौऱ्याद्वारे समितीने महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आगामी काळात त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाला योग्य त्या शिफारसी करण्यात येणार आहेत.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी महिलांच्या मुलांशी गळा र्भेटीच्या उपक्रमांबद्दल, सामाजिक संस्थां

संबंधित पोस्ट

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री६५१ बालकांना १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार

vishwatmaklokswamivarta

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

vishwatmaklokswamivarta

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी.

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार