vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

रशिया चीनला तैवानवर आक्रमण करण्यासाठी गुप्तपणे युद्धकौशल्य, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण…

रशिया चीनला तैवानवर आक्रमण करण्यासाठी गुप्तपणे युद्धकौशल्य, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण…

विदेश प्रतिनिधी रशिया चीनला तैवानवर आक्रमण करण्यासाठी गुप्तपणे युद्धकौशल्य, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशिया चीनला आधुनिक युद्धाचे डावपेच शिकवत असून, त्यामुळे जागतिक पातळीवर नव्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.

रशिया आपल्या युद्धानुभवाचा उपयोग करून चीनच्या फायर कंट्रोल आणि गनिमी युद्धकलेचे प्रशिक्षण देत आहे. आठशे पानांच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, रशियाने चीनला बीएमडी-चार-एम लाइट टँक, विशेष अँटी-टँक गन्स आणि एम्फीबियन टँक पुरवले आहेत. याशिवाय रशिया चीनमध्ये तंत्रज्ञान व देखभाल केंद्र स्थापन करणार असून, भविष्यात अत्याधुनिक हत्यारांच्या विकासासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शी जिनपिंग यांनी 2027 पर्यंत तैवान ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या लष्कराने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. रशिया चीनला केवळ सेना प्रशिक्षणच नव्हे तर हवाई, सागरी आणि सायबर युद्धासाठीही मार्गदर्शन देतो आहे, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

संबंधित पोस्ट

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सविस्तर चर्चा..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला🔸वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त🔸 स्थैर्य टिकवण्यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी-दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार…

vishwatmaklokswamivarta

इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर..