vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

            सांगली, प्रतिनिधी.) : जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सांगली जिल्हा परिषद 61-निवडणूक विभाग व 10 पंचायत समिती मधील 122-निर्वाचक गणांची आरक्षण सोडत झाली आहे. या आरक्षण सोडतीवर काही हरकती व सूचना असतील तर दिनांक 14 ते 17 ऑक्टोबर 2025 अखेर कार्यालयीन वेळेत संबंधित तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी, सांगली कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

      महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम, ५) च्या तरतुदी अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांच्या दिनांक 13 ऑक्टोबर 2025 च्या प्रारूप आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सांगली जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

      आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती/सूचना इत्यादी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

विशेष लेख -मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार..

vishwatmaklokswamivarta