vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

   सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या आरक्षण सोडतीस उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, तहसीलदार (सर्वसाधारण) लीना खरात आदि उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

सोडतीनुसार गटनिहाय आरक्षण, निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव अनुक्रमे पुढीलप्रमाणे –

महिला सर्वसाधारण – 46 येलूर, 48 वाकुर्डे बुद्रुक, 5 जाडरबोबलाद, 53 आरग, 20 वांगी, 14 नागनाथनगर नागेवाडी, 12 डफळापूर, 47 पणुंब्रे तर्फे वारूण, 7 संख, 16 करंजे, 3 निंबवडे, 38 कासेगाव, 39 वाटेगाव, 15 लेंगरे, 45 बागणी, 30 देशिंग, 33 दुधोंडी, 52 एरंडोली, 36 रेठरे हरणाक्ष

    महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – 21 देवराष्ट्रे, 40 पेठ, 13 बिळूर, 37 बोरगाव, 19 कडेपूर, 57 बुधगाव, 59 कवठेपिरान, 18 तडसर,

महिला अनुसूचित जाती प्रवर्ग – 61 म्हैसाळ (एस), 55 मालगाव, 56 कवलापूर, 54 बेडगसर्वसाधारण – 10 बनाळी, 58 कसबे डिग्रज, 4 खरसुंडी, 22 मांजर्डे, 50 मांगले, 26 चिंचणी, 2 करगणी, 32 कुंडल, 51 भोसे, 35 भिलवडी, 25 येळावी, 44 बावची, 8 दरिबडची, 17 भाळवणी, 42 कामेरी, 49 कोकरूड, 24 विसापूर, 43 चिकुर्डे, 27 मणेराजुरी,

नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग – 11 शेगाव, 1 दिघंची, 9 मुचंडी, 29 कुची, 28 ढालगाव, 41 वाळवा, 34 अंकलखोप, 60 समडोळी

अनुसूचित जाती प्रवर्ग – 31 रांजणी, 6 उमदी, 23 सावळज,दहा पंचायत समितीच्या 122 निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली

संबंधित पोस्ट

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट आणि प्रमाणपत्रांसाठी ब्रॉडबँड जोडणी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात येईल- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे