vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नमुंमपामार्फत विशेष कार्यक्रम संपन्न

         नवी मुंबई प्रतिनिधी   13 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आपत्ती निवारणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आपत्ती धोके निवारण दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त श्रीम. ललिता बाबर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षण विभाग उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड, उदयान विभाग उपआयुकत श्रीम. स्मिता काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम जाधव, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे, सुरक्षा अधिकारी श्री. रामचंद्र वारे आदी मान्यवर उपस्थित होते

   याप्रसंगी मागील वर्षभरात विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर व डॉ.कैलास गायकवाड यांनी आपत्तीच्या संम्भाव्य धोक्यांबद्दल तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली

  त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील मालिकेमधील सुप्रसिध्द कलाकार श्री.कुणाल मेश्राम आणि सहका-यांनी पथनाट्यद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहण्याबाबत मनोरंजनातून प्रबोधनात्मक सादरीकरण केले

     नमुंमपा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेतील पाच अग्निशमन केंद्रांना स्नेक किटचे वाटप करण्यात आले व ते वापरण्याच्या पध्दतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

 त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करू नये तसेच आग प्रतिबंध, सीपीआर व दैनंदिन जीवनात येणाऱ्या आपत्तीपासून कसा बचाव करता येईल व आपत्तीपासून होणारे आर्थिक व मानसिक नुकसान कसे टाळता येईल या विषयी प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाकरिता आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, साफसफाई कर्मचारी, अधिकारी – कर्मचारी, सुरक्षा विभागातील सुरक्षा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली 

vishwatmaklokswamivarta

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिवाळीसणासाठी शेतकऱ्यांना ‘समृद्धी’कडून चौथा वाढीव हप्ता दिवाळीपूर्वी 100 रुपये मे.टन प्रमाणे रक्कम होणार जमा

vishwatmaklokswamivarta