vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे नवी मुंबईत यशस्वी आयोजन

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे नवी मुंबईत यशस्वी आयोजन

       मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द रितीने प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २६ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके अशा विविध ठिकाणी ६१८ स्थायी, ७६ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल अशाप्रकारे ७२१ इतक्या मोठया संख्येने पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते.  ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ – या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांमार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती सर्वदूर पोहचविण्यात आली.      लसीकरण बूथवरील २ हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. अपेक्षित लाभार्थ्यापैकी ८६ % बालकांनी पोलिओ लसीचा लाभ घेतला.

 १०० % लाभार्थींचे पल्स पोलिओ लसीकरण व्हावे याकरिता दि. १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून ज्या बालकांना रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यासाठी घरांना भेट देणा-या नमुंमपाच्या स्वयंसेवकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

पंचायत समिती अंबरनाथ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

2.70 लाखाहून अधिक नागरिकांची आयुष्मान कार्ड निर्मिती – आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक