vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

मुंबई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपसंचालक गोविंद अहंकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकात मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांचे अनुभव वर्णन, कविता, भरडधान्याचे आरोग्यदायी उपयोग, सुलेखन मालिका, कचरा व्यवस्थापन, ई-पेपर आदी विषयांवरील माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.आपलं मंत्रालयचा अंक वाचण्यासाठी https://mahasamvad.in/182051/ किंवा https://dgipr.maharashtra.gov.in/node/4659 या लिंकवर भेट द्या.#आपलंमंत्रालय CMOMaharashtra Aditi Tatkare Maharashtra DGIPR Ddikonkan Konkanbhavan

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया !-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे• शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेश योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न