vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीर संपन्न

दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीर संपन्न

सातारा प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीराचे आयोजन स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आले होते.

 शिबीराचे उद्घाटन अरविंद वाघमारे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांचे शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता विनायक काळे, युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर आदी उपस्थित होते.

या शिबीरात दिव्यांग बालकांना युडीआयडी कार्ड, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीरात सातारा जिल्हयातील १६ शासकीय शाळा व अशासकीय संस्था येथील बालकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयोजन करण्यात आले.शिबीरात एकूण ९५ दिव्यांग बालकांची आभा कार्ड, आयुषमान कार्ड, युडीआयडी या करता नोंदणी करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत 85% इतके उल्लेखनीय काम महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस29 जूनपासून घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना करणार लसीकरण

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग