vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

 मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनस म्हणून महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. राज्यातील इतर कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर झाला आहे

 मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. दीपावली २०२५ करता ३१ हजार सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 महानगर पालिकेच्या खालील वर्गवारीच्या कर्मचाऱ्यांना आज दीपावली – २०२५ करीता ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात महानगर पालिका अधिकारी आणि कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित आणि विनाअनुदानित),अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित आणि विनाअनुदानित) आदींचा समावेश असून यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे.

[ तसेच सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये १४,००० तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये ०५,००० भेट देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत,तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला..

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार*  – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*