vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

सांगली, प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली. आज पहाटे सव्वा पाच वाजता “दर्शन एक्सप्रेस” या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठविण्यात आली.

 मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे व समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “दर्शन एक्सप्रेस” रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

 प्रायोगिक तत्वावर फळे, भाजीपाला पाठविला असून तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा आठवड्यातून एकदा रेल्वेने पाठविण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व रेल्वे विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचे ही आभार मानले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार व त्यांचे सर्व अधिकारी श्री. पाटील, श्री. माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

00000

संबंधित पोस्ट

नमुंमपा शाळांतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात – वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे* *शासनाचे धोरण- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे* *पाटील*

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी …

vishwatmaklokswamivarta