vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

*स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

चिखली प्रतिनिधी-: मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली येथील निराधार बेघर वृद्धाच्या निवास बांधकाम साठी स्व.यश शंकरराव मलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ मलवार परिवाराच्या वतीने टिन १० टिन भेट दिले.

मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी सर्व सोईसुविधा सह निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. याची दखल मलवार परिवाराने घेत स्व.यश शंकरराव मलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ १० टिन भेट देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार बेघर वृद्धांच्या सेवे करीता किणतेही शासकीय मदत मिळत नाही. परंतु समाजातील दानी व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर निरंतर निःस्वार्थ सेवा देणे सुरु आहे. याची दाखल घेत शंकर राव मलवार यांनी सह परिवार येऊन स्व यश यांचा स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमाला साहित्य स्वरूपात मदत केली. यावेळी मलवार परिवाराचे शंकर राव मलवार, ग्रामपंचायत भोकर चे सरपंच गजानन फोलाने, सामाजिक कार्यकर्ते मनोहर डोंगरदिवे, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, सदस्य, संदीप डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे, सुनील साळवे संघर्ष, केपी साळवे,अनिल साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप..

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार..

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

माजी लष्करअधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’*