vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

सांगली, प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील मौजे नाटोली येथे मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत ३ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार सत्यजीत देशमुख व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.नाटोली येथील जमीन गट क्रमांक ११६ मध्ये १४ एकर जागेवर होणार हा प्रकल्प गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसभर स्वस्त व स्थिर वीजपुरवठा होणार आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून कृषि पंपांना वीज पुरवली जाणार असल्याने शेतकऱ्यांचा वीज बिलाचा खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्चात बचत होईल. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.आमदार सत्यजीत देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची क्रांतिकारी योजना आहे. नाटोली येथील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना थेट लाभ होईल. सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळेल, यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हा प्रकल्प राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. येत्या तीन महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर शिराळा तालुक्यातील शेतीसाठी वीजटंचाईचा प्रश्न संपुष्टात येईल, असे सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर

दीपावली सणानिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु …

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन