vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी  वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी  वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, प्रतिनिधी: पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक घरासाठी २.३० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या गावच्या नागरिकांनी घर बांधण्यासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. हा वाढीव निधी विविध कंपन्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध होण्यासाठी संबधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत रायगड जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौजे केवनाळे ता. पोलादपूर (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे आदी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, केवनाळे येथील कुटुंबाचे खासगी मालकीच्या जागेमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात येऊन याठिकाणी वीज, पाणी पुरवठा, शौचालय आदी सुविधांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. नागरिकांनी इरशाळवाडी व तळीये येथील नागरिकांना देण्यात आलेल्या घरांप्रमाणे घरे मिळावीत अशी मागणी केली आहे. यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अधिकचा निधी मिळण्याबाबत बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

केवनाळे गावांमधील नागरिकांना घर बांधणीसाठी प्रत्येक घरासाठी २.३० लाखाचा निधी राज्य गृह व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण ऐवजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन हा निधी जिल्हाधिकारी, रायगड यांच्यामार्फत संबंधित तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहे, असेही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी विशेष दर्शन

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक-तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा घ्या- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासंबंधी बैठक

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*