vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

        सातारा प्रतिनिधी : मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सातेरी मधपेट्या वाटप व नामफलक अनावरण करण्यात येणार आहेत

महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना आरती ड्रग्ज,लि.बोईसर,मुंबई व स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा.लि.मुंबई, यांच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीतून सातेरी मधपेट्या मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मधपाळांना मांघर येथे दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आहे आहे.

 यासाठी रवींद्र साठे,सभापती(राज्यमंत्री दर्जा)महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, रवींद्र ठाकरे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, नित्यानंद पाटील,उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, प्रकाश पाटील अध्यक्ष आरती ड्रग्ज लि.बोईसर मुंबई, विवेक दामले,अध्यक्ष,स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा.लि.मुंबई, रघुनाथ नारायणकर प्र.संचालक मध संचालनालय महाबळेश्वर, निसार तांबोळी,प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सातारा, गणेश जाधव सरपंच मांघर गांव हे उपस्थित राहणार आहेत.

000000

संबंधित पोस्ट

महाड येथील दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ संपन्न,राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अरुणोदय वॉकर्स असोशियन बांद्रा पुर्व, यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा सत्याचा मोर्चा सुरू

vishwatmaklokswamivarta