vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स असोशियन बांद्रा पुर्व, यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

 अरुणोदय वॉकर्स असोशियन बांद्रा पुर्व, यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

 

मुंबई प्रतिनिधी- चार दशकांपासून बांद्रा पूर्वसह मुंबईतील इतर ठिकाणाहून एकत्र आलेल्या सभासदांसाठी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळात एमआयजी क्लब येथील टेरेस हाॅल वर, बांद्रा पूर्व येथे उत्साहात संपन्न झाला

जेष्ठ संस्थापक सदस्य श्री. नीळकंठ श्रीखंडे साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना संस्थेचा पूर्व इतिहास आणि अडचणी तसेच सध्याच्या स्थितीत ज्या संस्थाचालकांनी हे कार्य पूर्ण चालू ठेवले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप मारली यावेळी श्रीखंडे दादा यांचा संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्यासह संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे, श्री किरण भोगले, सेक्रेटरी, श्रीमती शिल्पा शिरोळे ट्रेझरर, श्री दिलीप गाडेकर, श्रीमती शैलजा सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.त्याचवेळी 80 वर्षे पूर्ण केलेल्या सभासद सौ. पोतनीस व श्री. भासूर यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये नाच, गाणे एकांकिका,नाट्य कथा, कविता वाचन, करण्यासह श्रीमती जयश्री चौधरी लिखित ग्रुप नाटिका एकांकिका विठोबा व पोटोबा तसेच श्रीमती शैलजा सोमाणी लिखित ग्रुप नाटिका भगवान श्रीकृष्णाचा अवतार (दशावतार) सादर करण्यात आला दोन्ही नाटिकांना सभासदांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

 सदर कार्यक्रमासाठी पूर्वतयारी पासून शेवटपर्यंत श्रीमती भारती पोळ,सौ. अंजली रिसबुड, सौ. सुनंदा भोगले, श्री हरीश भाई,सौ.वसुंधरा देशपांडे, श्री मोहन साळवी, सौ.शैलेजा सोमाणी या सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्थळी सर्व श्री राजेश सोमाणी, संजय शिरोळे, हेमंत देशपांडे यांनी व्यवस्था चोख ठेवण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाहक श्री किरण भोगले यांनी केले तर सहकार्यवाहक श्री दिलीप गाडेकर यांनी उपस्थितांसह आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी एकत्रित स्नेहभजनाने जेवणाचा आस्वाद घेऊन समारोप करण्यात आला.

संबंधित पोस्ट

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर*श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार”*

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ..