vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य सरकारने आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी – राजेंद्र कांबळे अध्यक्ष, जय जवान जय किसान संस्था

राज्य सरकारने आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी – राजेंद्र कांबळे अध्यक्ष, जय जवान जय किसान संस्था

 

 

मुंबई प्रतिनिधी-मुंबई- महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्वपूर्ण समजला जातो.राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार देण्याचं काम हे शासकीय रुग्णालय करत असतात. त्याकरिता जिल्ह्यानिहाय जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मनो रुग्णालय जनतेसाठी खुले आहेत. रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान स्तनदा माता व बालकसह रुग्णास नाश्ता, दूध, फळे व दोन वेळा भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते.याकरिता आरोग्य विभागाने जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिनी भोजन, दूध, फळे, नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्त्वावर सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, महिला उत्पादक सहकारी संस्था, बचत गट, बेरोजगार सोसायटी तसेच इतर खाजगी कंपन्या यांना देण्यात येत असते.याकरिता शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये कंत्राटदारांना अदा केले जाते.ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावे लागते. बहुतांश संस्था नियमावलीचे पालन करत असतात. परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करून घेतात.

त्यापैकी एक म्हणजे कैलाश फूड किराणा स्टोअर्स सदर कंपनीने 2022 मध्ये निविदा क्रमांक CHS/PUR/SEC/NHS/PATIENT SERVICE/PLATE SYSTEM 2021/2022 आहार सेवा निविदा अर्ज दाखल करतेवेळी कैलाश फूड किराणा स्टोअर्स या संस्थेचे संचालक दिलीप म्हेत्रे यांनी१. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, सातारा २. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, अकोला ३. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, लातूर ४. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, पुणे ५. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवले. याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्र विषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरहू प्रमाणपत्र खोटे असल्याचे दिसून आल्याने सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध होते.    सदर प्रकरणी कैलाश फूड किराणा स्टोअर कंपनीने आरोग्य विभागाची फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने अशा

कंपनीला काळा यादीत टाकण्यासाठी आरोग्य विभाग तत्परता का दाखवत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कैलाश फूड किराणा स्टोअर्स या कंपनीचे सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग येथील चालू असलेले टेंडर तात्काळ रद्द करून कैलाश फूड किराणा स्टोअर्स या कंपनीस कायमस्वरूपी ब्लॅक यादीत टाकण्यात यावे. तसेच आहार पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली.   या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यासजय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिरालाल केदार यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

धर्मवीर संभाजी हायस्कूल ठरले ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे पहिले विद्यालय.विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात – २५ वर्ष जुन्या आठवणींनी शिक्षक -विद्यार्थ्याचे पाणावले डोळे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश..

vishwatmaklokswamivarta

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन; महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमासह विविध भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी