vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत*

*बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत*

 

*ठाणे, प्रतिनिधी-* बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील प्रकरण ५ मधील कलम २७ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ चा नियम ९० च्या अन्वये गठित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१च्या अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-१ येथील ०१ अध्यक्ष व ०४ सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील ०२ सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी ०१ सदस्य पदे अशी एकूण १० पदे वगळून उर्वरित सर्व बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत

वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह १५ दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय दुसरा मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर करावेत. 

00000

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदार संघ मतदार यादीमध्ये18 डिसेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार· दावे व हरकती दाखल करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई