vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ..

नवी दिल्ली प्रतिनिधी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  हरिद्वार, उत्तराखंड येथे पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला.या प्रसंगी भाषण करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, भारतातील महान व्यक्तिमत्वांनी मानव संस्कृतीच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. महान ऋषी पतंजली यांनी योगासनांद्वारे मनातील, व्याकरणाद्वारे वाणीतील आणि आयुर्वेदाद्वारे शरीरातील अशुद्धी दूर केली. पतंजली विद्यापीठ समाजापर्यंत महर्षि पतंजलि यांच्या महान परंपरेचा प्रसार करीत असल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला

राष्ट्रपतींनी नमूद केले की, पतंजली विद्यापीठ योग, आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सा या क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधन पुढे नेत आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रशंसनीय प्रयत्न असून या माध्यमातून निरोगी भारत घडविण्यासाठी उपयोग होत आहे.

राष्ट्रपतींनी पतंजली विद्यापीठाच्या भारतकेंद्रित शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, वैश्विक बंधुभावाच्या भावनेने प्रेरित शिक्षण, प्राचीन वैदिक ज्ञान आणि अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन यांचे एकत्रीकरण, तसेच जागतिक आव्हानांचे निराकरण, हे सर्व आधुनिक काळात भारतीय ज्ञानपरंपरेला पुढे नेत आहेत.

राष्ट्रपतींनी सांगितले की, या विद्यापीठाच्या आदर्शांनुसार शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे निश्चितच जाणवले असेल की, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली अवलंबणे हे मानवजातीच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हे विद्यार्थी हवामान बदलासह सर्व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमी तत्पर राहतील

राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या सदाचरणाने एक निरोगी समाज आणि विकसित भारत घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ५.८ टक्के दराने परतफेड

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल’चे उद्घाटन महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

विकसित भारत जी राम जी – ग्रामीण रोजगाराला नवी दिशा- १२५ दिवसांची रोजगार हमी- ३१८ प्रकारच्या विकासकामांना चालना

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ