vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी-महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांचे आवाहन

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी-महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांचे आवाहन

द ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) — मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, यासाठी अंतिम मुदत दि. १८ नोव्हेंबर, २०२५ निश्चित करण्यात आली आहे,अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते,मात्र ही मदत सतत मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.

ई-केवायसी प्रक्रिया म्हणजे लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी होय. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचे अनुदान कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल.

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी. ई-केवायसी करताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून योजनेंतील लाभ अखंडपणे सुरू ठेवावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

रसच्या रंगतदार दुनियेत हरवलेलं मन; खरेदीसोबत प्रेरणेचीही मेजवानी!”वाशीच्या CIDCO Exhibition Centre मध्ये भरलेला ‘महालक्ष्मी सरस’ सोहळा…

कृपया प्रसिद्धीसाठी-कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला! वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत