vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी आता कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

नगरविकास विभागाने यापूर्वी २३ मे २०२५ रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, “कुळगाव बदलापूर नगरपरिषद” यांच्याऐवजी “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण” ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रकल्पातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

 शासन निर्णयानुसार, या बदलामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईल, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

vishwatmaklokswamivarta

सिंचन प्रकल्प विहित वेळेत  क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न- पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा- पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश..

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय– मंत्री शंभूराज देसाई भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta