vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

       लातूर, प्रतिनिधी: आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक(प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

   बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 मधील कलम 12(1)(सी)नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. पालकांना प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक), प्रशासन अधिकारी महानगर पालिका/नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या depmh2@gmail.com व आयुक्त(शिक्षण), पुणे यांच्या educommoffice@gmail.com या ई-मेलवर अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी.

   प्रलोभन देण्याचा असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

जिल्ह्यातील होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी नियमावली लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत