vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

बुलढाण्यातील दुर्दैवी धक्कादायक घटना- आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं…

बुलढाण्यातील दुर्दैवी धक्कादायक घटना- आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं…

राज्य प्रतिनिधी-

बुलढाणा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना चिखली तालुक्यात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून अखेर स्वतःचाही जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय . या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच दिवशी संपूर्ण कुटुंब संपल्याने गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील विशाल सुभाष डुकरे (वय 42) या व्यक्तीने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. यात वडील सुभाष डुकरे (वय ७५) आणि आई लता डुकरे (वय 65) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर विशाल डुकरेंने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही भीषण घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे. या हत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली जात आहे  या घटनेनंतर सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांची हत्या करून पुराने स्वतःचाही जीव संपवल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक तपासणी आणि मृतदेहांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच हत्येमागचं खरं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवण्याचे विनंती..

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामावून घेतलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी गावकरी, साईबाबा संस्थान, नगरपालिका यांनी समन्वयाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य*

vishwatmaklokswamivarta