vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

ठाणे, प्रतिनिधी :- संत सावतामाळी मंडळ व सृजन संवेदना फाउंडेशन यांच्या वतीने दि.1 नोव्हेंबर 2025 रोजी ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास विभागा व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे स्टॉल लावण्यात आला होता. मेळाव्यास उपस्थित अभ्यागतांनी स्टॉल वर भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली

या मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वन मंत्री गणेश नाईक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमात परिसरातील स्वयंरोजगाराकरिता इच्छुक असणाऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालयाचे अनंत माळी यांनी उपस्थितांना विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजानांबद्दल माहिती दिली.

या प्रसंगी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्टॉलला भेट दिली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे अधिकारी श्री.राजू साबळे, रोहित कुलकर्णी, माहिदीप सिंग, आकाश गोरे व अण्णासाहेब पाटील माहामंडळाचे राजेश बडे, संदेश काटकर व शुभम शिंदे हे समन्वयक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर  यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत* नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन * मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांचा बैठकीत निर्धार

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याथकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत..

vishwatmaklokswamivarta