vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)-फार्मर आय डी अर्थात ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मदत अनुदान त्यांच्या खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी शनिवार दि.८ व रविवार दि.९ रोजी प्रत्येक गावात विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात १३५५ गावांमध्ये ६ लाख ३१ हजार ७८ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. अद्याप १ लाख ३१ गहार ७६५ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. तर ४८ हजार ३५५ ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता नाही.

शून्य ते २ हेक्टर पर्यंतच्या ६ लाख ४४ हजार ६४९ शेतकऱ्यांना एकूण बाधीत ५१९४६४.७४ हेक्टर क्षेत्रासाठी ४८० कोटी १७ लाख ३ हजार रुपये इतके अनुदान मंजूर आहे. त्यापैकी ४ लाख ६३ हजार १४९ शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी अपलोड करण्यात आली असून त्यांची एकूण रक्कम ३४७ कोटी २० लक्ष ३४ हजार रुपये इतकी आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७५१ शेतकऱ्यांना २१५ कोटी ६५ लख ७३ हजार रुपये इतके अनुदान वाटप झाले आहे.

तर २ ते ३ हेक्टर क्षेत्र बाधीत असलेल्या ४१ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी १२ हजार ७६७ शेतकऱ्यांचे अनुदान ६ कोटी ४५ लाख १२ हजार रुपये इतके अपलोड झाले आहे. तर प्रत्यक्षात ८ हजार ३०७ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लक्ष ३ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात अद्याप १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यामुळे त्यांचे अनुदानाबाबत प्रक्रिया होत नाही. तरी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे अनुदान वितरीत करण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावात शनिवार दि.८ व रविवार दि.९ जी सर्व गावात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यात सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आज निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्या त्या गावात आपले सरकार सेवा केंद्रही सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

 

०००००

संबंधित पोस्ट

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,

जिल्हा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक गर्भपात-सोनोग्राफी केंद्र,गर्भपात गोळ्यांच्या विक्रीची तपासणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ