vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकप्रदेश

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

नवी दिल्ली प्रतिनिधी : साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ व ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे या युवा साहित्यिकाला ‘खोल खेल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेसाठी मंथन बचाणी यांच्या ‘पांधीअड़ो’ या कविता संग्रहाची ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी बालसाहित्यकार कवी डॉ. सुरेश सावंत यांची त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहासाठी निवड करण्यात आली आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2025 साठी ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील एकूण 23 युवा लेखकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली. तर बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 24 बालसाहित्यकारांची निवडीची आज घोषणा झालेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. डोंगरीमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा सध्या करण्यात आलेली नाही.

मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला 2025 सालचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

 ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचे प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते. मुंबईच्या चाळीतील जीवन, बदलते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि तरुण मनातील भावनिक हुंदके यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या कृती हळूहळू चिंतनशील आणि अस्तित्वाच्या शोधाकडे वळतात, ज्यामुळे ही कादंबरी नव्या पिढीचा सशक्त आवाज मानली जाते. प्रदीप कोकरे यांचे लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे तसेच आधुनिक तरुणांच्या भावनांचे गहन चित्रण करते. त्यांची साधी पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते.

युवा पुरस्कारासाठी मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक प्रो. अविनाश कोल्हे, श्री. इंद्रजीत भालेराव व डॉ. रणधीर शिंदे यांचा समावेश होता.

‘पांधीअड़ो’ हा मंथन बचानी यांनी लिहिलेल्या सिंधी कवितांचा जीवंत संग्रह आहे. मंथन बचानी हे मुंबईचे आहेत. त्यांचा कविता संग्रह अधिकाधिक वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचावे यासाठी कवीने हे पुरस्तक सिंधी देवनागरी आणि अरबी लिपीमध्ये केलेले आहे. समकालीन सिंधी अनुभवात रुजलेल्या कार्यालये, प्रेम, निसर्ग, तारुण्य, ओळख आणि सांस्कृतिक संबंध या विषयांचा शोध या कविता संग्रहात बचानी यांनी घेतला आहे.

डॉ. सुरेश सावंत हे मराठीतील ज्येष्‍ठ बाल साहित्यकार आणि कवी असून, त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहास 2025 सालचा मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

संबंधित पोस्ट

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले…

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी राजे यांना तुळजापूर मंदिरात गाभार्‍यात प्रवेश नकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत आरोग्य क्रांती : जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन**औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन