vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी : आदिवासी विकास विभागातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत समाविष्ट योजनांसाठी आदिवासी बांधवांनी दि. 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी मोहनकमार व्यावहारे यांनी केले आहे.

या योजनांत 85 टक्के अनुदानावर वनहक्कधारक आदिवासी लाभार्थ्यांना काटेरी तार, आदिवासी शेतकऱ्यांना काटेरी तार, आदिवासी युवक-युवतींना पिठाची गिरणी, आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना खाद्य स्टॉल, आदिवासी शेतकऱ्यांना पावर डिलर, महिला-पुरुष बचत गटांना खाद्य स्टॉल, होजिअरी गारमेंटसाठी अर्थसहाय्य आदींचा समावेश आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर दि. 15 जुलै 2025 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

सदर योजनांमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बदल करण्याचा व कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. तरी संबंधित जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर भेट देऊन आपले अर्ज तत्काळ सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण आरोग्यपुरक उत्पादनांवर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta