vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

राज्य प्रतिनिधी –

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ असल्याचे सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तरुणांच्या मनातील प्रत्येक कल्पना ही नाविन्यता असून स्टार्टअप्सच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला नवउद्योजक बनण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठ परिसरात झाले. महिला शिक्षणाचे महत्त्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव, ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.