vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू

        सांगली, प्रतिनिधी) : मल्लखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे. या खेळामध्ये मानसिक, शारीरिक संतुलन आणि धैर्य सुध्दा आहे. अनेक छत्रपती पुरस्कारार्थी या खेळामधील आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे या खेळाचा वसा आणि वारसा खेळाडुंनी जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.

    जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल मिरज येथे आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते बाबासाहेब समलेवाले, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी नरेश सावंत, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खेळाडुंनी त्यांच्यामधील जे उत्तम आहे ते प्रकट करावे. या स्पर्धा निकोप वातावरणात पूर्ण कराव्यात. खेळाडुंनी खेळाचा आनंद मनमुराद लुटावा. आपल्याला विपरित परिस्थितीत संतुलन साधता आले पाहिजे, हे सर्व मल्लखांब खेळातून शक्य होते. या खेळाचे नाव देशभरात जगभरात, नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ही स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

    यावेळी आशियाई ॲक्रोबेटिक्स स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडुंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण आठ विभागातून चार मुले व चार मुली तसेच पंच, निवड समिती सदस्य, तांत्रिक अधिकारी असे एकूण 125 खेळाडू व अधिकारी यांचा सहभाग आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

       प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी केले. आभार तालुका क्रीडा अधिकारी विकास माने यांनी मानले

संबंधित पोस्ट

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेला नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

क्रीडा स्पर्धेतून खिलाडु वृत्ती विकसित व्हावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….