vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

व्यावसायिक प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, – भारत सरकारच्या पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) यांच्यावतीने प्लास्टीक प्रोसेसिंग मशिन ऑपरेटर हा चार महिने कालावधीचा विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या अभ्यासक्रमास इच्छुकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हा अभ्यासक्रम पूर्णतः निःशुल्क असून राज्यातील रहिवासी असलेल्या १८ ते ३० वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय , आर्थिक मागासलेल्या गटातील युवक युवतींसाठी हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम विनामूल्य आहे. या अभ्यासक्रमाच्या ५५ जागा असून १० वी उत्तीर्ण किंवा त्याच क्षेत्रातील अनुभव असलेल्या इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवारही अर्ज करु शकतील.अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर आहे. प्रवेश प्रक्रिया दि.२४ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. अधिक माहितीसाठी ९३२५६८७९१०/ ९६०१३६४५५०/९१४५६७५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक सिपेट, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..

आताची मोठी बातमी – सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र; विद्यार्थ्यांवरील कारवाई न करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …