vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

       जालना, प्रतिनिधी- जालना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरवासीयांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास हातभार लावा. आपल्या सर्वांच्या सहभागाने जालना शहर एक आदर्श स्वच्छता असलेले शहर बनवूया, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

  जालना महानगरपालिकेच्या वतीने दर शुक्रवारी सायं. 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे. या श्रमदानाचा आज प्रारंभ करण्यात आला. या श्रमदानाला नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, जालना फस्ट, रोटरी क्लब आणि महापालिका अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

    जालना शहरात दर शुक्रवारी सायं. 5:30 ते 6:30 शहर स्वच्छतेसाठी श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. आपल्यासोबत हातमोजे, मुखपट्टी, आणि पाण्याची बॉटल असावी. सहभागी व्हा, योगदान द्या आणि आपल्या शहराला एक आदर्श शहर बनविण्यासाठी आपण प्रयत्न करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

_*_*_*_*_

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट

vishwatmaklokswamivarta

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..