vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कल्पना बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कल्पना बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बुलढाणा : प्रतिनिधी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संयमी, समर्पित आणि सतत जनतेत राहून काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या कल्पना आनंद बोर्डे यांनी आज १७ नोव्हेंबर रोजी कोणताही गाजावाजा न करता शांत, नेटक्या पद्धतीने प्रभाग क्रमांक १३ मधून नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मिरवणुका, ढोलताशे, गर्दी काहीही नाही — फक्त काम, सेवा आणि जबाबदारी यांवर आधारित त्यांची शैली प्रभागात चर्चेचा विषय ठरली आहे.

कल्पना बोर्डे ह्या हे शिवसेना शिंदे गटाच्या सक्रिय सदस्या असून आमदार संजय गायकवाड यांच्या एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. विविध कार्यक्रमांचे शिस्तबद्ध आयोजन, प्रभागातील समस्यांवर सतत पाठपुरावा, नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नागरिकांना रक्त उपलब्ध करून देण्याची सेवा आणि त्यांची सेवाभावी कार्यशैली शहरात पसंत केली जाते. या उमेदवारीनंतर शहरात “मिलिंद नगर व प्रभागाला विकासाचा नवा चेहरा मिळणार” असल्याची चर्चा सुरु आहे.

संबंधित पोस्ट

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

vishwatmaklokswamivarta

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण..

मुंबई महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता…हवामान विभागाचा अंदाज