vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

 सांगली, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 आहे, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत बँक खाते इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 1 डिसेंबर पर्यंत सहाय्यक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे नावे पाठवावेत, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे -मुख्य सचिव राजेश कुमार

vishwatmaklokswamivarta

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा— खा. श्रीरंग बारणे,जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta