vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी*

*नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी*

 

गडचिरोली, प्रतिनिधी  : आगामी नगरपरिषद निवडणूक-2025 अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांनी आज कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या ईव्हीएम कमिशनिंग प्रक्रियेची तपशीलवार पाहणी केली.
यावेळी निवडणूक निरीक्षक मीनाज गनी मुल्ला, गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते.
कमिशनिंग दरम्यान मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम तयार केल्या जात असून, प्रत्येक यंत्राची तांत्रिक तपासणी, उमेदवारांची नावे व बॅलेट पेपरची अचूकता तसेच यंत्राची क्लोजिंग प्रक्रिया, व्यवस्थित झाले आहे की नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली. आवश्यक त्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वॉलपेपर डिस्प्ले, मतदान केंद्रांची स्वच्छता, कर्मचारी नियोजन आणि सुविधा यांचे संपूर्ण मूल्यांकन करून मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने त्या अनुषंगाने सुरक्षेची पाहणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची व्यवस्था, पत्रकार कक्ष आणि नागरिकांसाठीच्या सोयी व स्वच्छता याबाबतही त्यांनी पाहणी केली.
*मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी*ईव्हीएम प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली. यामध्ये महिला महाविद्याल मतदान केंद्र, झाशी राणी नगर येथील नगरपरिषद ग्रंथालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांचा समावेश होता.मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, प्रत्येक केंद्र सुस्थितीत व सुबकपणे कार्यरत राहावे असे सांगून या सर्व ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांची उपलब्धता, स्वच्छता, स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, रॅम्प, दिव्यांगांसाठी प्रवेश सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सुधारणा विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ज्या ठिकाणी किरकोळ त्रुटी आढळल्या, त्याबाबत त्यांनी तात्काळ उपाययोजनांची सूचना करत मतदान केंद्रे पूर्णपणे सज्ज ठेवण्याविषयी भर दिला.
मतदान साहित्याची वाहतूक आणि व्यवस्था*जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान साहित्याच्या वाहतूक नियोजनाचा देखील आढावा घेतला. मतदान साहित्य कोणत्या वेळेत, कोणत्या क्रमाने व कोणत्या वाहनाद्वारे केंद्रावर पोहोचवायचे याबाबतची सविस्तर माहिती घेऊन त्या अनुषंगाने निर्देश दिले.

संबंधित पोस्ट

यमाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू*

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta