vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांची शोकसभा संपन्न आठवणी व्यक्त करताना अनेकांना अश्रू झाले अनावर…

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांची शोकसभा संपन्न आठवणी व्यक्त करताना अनेकांना अश्रू झाले अनावर…

ठाणे, प्रतिनिधी- स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील समिती सभागृह… वेळ: सायंकाळी 5.30 वा… संपूर्ण सभागृह नि:शब्द… सभागृहातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी दु:खी चेहऱ्याने स्व.पल्लवी सरोदे यांच्या प्रतिमेकडे पाहत आपल्या आठवणींना उजाळा देत होते.प्रसंग होता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे स्व.पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेचे आयोजनाचा…ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या स्व.पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचे काल (दि.23 मार्च) हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर अपघाती निधन झाले. या पार्श्वभूमीवर स्व.पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

शोकसभेच्या प्रारंभी उपस्थित सर्वांकडून स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मृतीस अभिवादन करीत दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्र. अपर जिल्हाधिकारी विकास गजरे, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महसूल प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, उपसंचालक सीमा पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.या शोकसभेत स्व.पल्लवी सरोदे यांच्या आठवणीने उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले. यावेळी आपल्या संवेदना व्यक्त करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, स्व.पल्लवी सरोदे यांचे ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे अत्यंत दु:ख होत आहे. स्व.पल्लवी सरोदे यांच्या आत्म्यास शांती मिळो व या दु:खातून सावरण्यासाठी श्रीमती सरोदे यांच्या कुटुंबास ईश्वर बळ देवो, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रशासन स्व.सरोदे यांच्या कुटुंबाच्या कायम सोबत असेल.

 शोकसभेच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद हिवाळे, नायब तहसिलदार स्मितल यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तथा निवडणूक शाखेतील अव्वल कारकून ऋषिकेश कुलकर्णी, जिल्हाधिकारी महोदयांचे अंगरक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील भाट, महिला व बालविकास विभागाच्या महिला प्रतिनिधी यांनी स्व.पल्लवी सरोदे यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा देवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

शेवटी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्व.पल्लवी सरोदे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले