vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित,डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित झाले आहे. डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित झाले आहे. डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने केले आहे. या उद्घाटनामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे.

अंधेरी पश्चिम ते मंडाळे – चेंबूर या संपूर्ण मेट्रो २ बी मार्गिकेचा डायमंड गार्डन ते मंडाळे हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सुमारे पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गिकेवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रो सुरू करण्यातील मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. हा मार्ग चेंबूर, मानखुर्द आणि मंडाळे या पूर्व उपनगरांना थेट मेट्रो नेटवर्कशी जोडणार आहे. सध्या या भागात रेल्वे आणि रस्त्यांवर प्रचंड ताण असतो. मेट्रो सुरू झाल्यावर या भागातील हजारो प्रवाशांना लोकल ट्रेन किंवा रस्त्यावरील वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.मेट्रो २ बी च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आले होते,

चार डिसेंबर हा दिवस केवळ मेट्रोसाठीच नाही, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याच दिवशी प्रारंभ होणार आहे. मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग असलेल्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी बोगद्याच्या कामाला या दिवशी सुरुवात होणार आहे. बोगद्याच्या खोदकामासाठी आवश्यक असणारे टनेल बोरिंग मशीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जमिनीखाली उतरवले जाईल. हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक जलद होणार आहे.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

vishwatmaklokswamivarta

मुंबई  पोलीस उपायुक्त परिमंडळ ​​4, मुंबई पोलिसांनी 3 बांगलादेशी नागरिकांना तीन ठिकाणी अटक केली.

vishwatmaklokswamivarta

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून  गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 3 अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न साकार,- वैयक्तिक कर्जासाठी 83 कोटी, गट प्रकल्प कर्जासाठी सहा कोटींचा व्याज परतावा.

vishwatmaklokswamivarta