vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

 

रायगड -अलिबाग प्रतिनिधी जवाहर नवोदय विद्यालय, पीएमश्री स्कूल, निजामपूर येथील इयत्ता सहावीकरिता प्रवेश परीक्षा शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार असून ८० जागांसाठी निवड प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत राघमवार यांनी दिली

परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नावे, रजिस्ट्रेशन क्रमांक तसेच ओळखपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळावरील प्रवेश पत्र डाउनलोड करावेत.

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

https://navodaya.gov.in

विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख हीच ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक पासवर्ड माहिती असेल, असेही प्राचार्यांनी सांगितले आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास संतोष चिंचकर (९८८१३५१६०१) किंवा अर्जुन गायकवाड (९८६२७९३६४०) यांच्याशी संपर्क साधावा.

००००

संबंधित पोस्ट

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न, परिसरात तणाव…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात सामुहिक मतदान शपथ ग्रहण

vishwatmaklokswamivarta

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…