vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी• जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश • पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी• जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश • पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सन 2026-2025 या काळातील एकुण 18 प्रकरणांचा समावेश असून, केवळ 4 प्रकरणी प्रस्ताव प्राप्त आहेत. उर्वरित प्रकरणांत पात्र वारसांनी दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मनोज मेरत यानी केले आहे

दरम्यान, शासन निर्णयानंतर २८ नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात पीडित कुटुंबीयांची सभा घेण्यात आली. सभेत नोकरीसाठी आवश्यक निकष, कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यावेळी ४ पात्र वारसांनी त्वरित प्रस्ताव सादर केले, तर इतर १४ कुटुंबीयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

प्रस्ताव प्रलंबित कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रे तत्काळ दाखल करावीत. शासनाच्या संवेदनशील निर्णयाचा लाभ कोणतेही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी संबंधितांनी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधून प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत.

000000

संबंधित पोस्ट

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

vishwatmaklokswamivarta

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली सोरेन यांना श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..