vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशराजकारण

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

        सांगली, द प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुसऱ्या टप्प्यात झालेल्या शिबिरात 112 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी 101 पिशव्या रक्तदान झाले होते. तसेच आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 112 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी कार्यालयामधील या दोन्ही शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

    जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्र यांच्यावतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, तहसीलदार लीना खरात, तहसीलदार (महसूल) जितेंद्र मोरे, मिरजच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, अप्पर तहसिलदार सांगली अश्विनी वरुटे, अनिल कोळी, तसेच, इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शिरीष काळे, उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास नाटेकर, विनय भट तसेच पदाधिकारी व स्टाफ, जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान चळवळीच्या या सांगली पॅटर्नमध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. तसेच, रक्तदान केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले

संबंधित पोस्ट

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta